GET YOUR BIBLE OF FILM MAKING
Marathi Bhasha Sanskruti App


IMPORTANT FILM INSTITUTES
FILM INDUSTRY ARTIST AND 
TECHNICIANS NETWORK
KNOW HOW TO PRODUCE MOVIE
FILM GRANTS AND FUNDING
HomeUpcoming Events Gallery Film Direction CourseAbout SenseindiaScript Writing Contact us
Testimonial LITERATUREgrandlightashramSenseflix moviesvrindashray.orgIdea to Screen
current affairs

 मराठी 
 भाषा
 साहित्य 
 संस्कृती 
 प्रणाली

नमस्कार मंडळी !!! मराठी संस्कृती ची अस्मिता संवेदनशिलतेने जपण्यासाठी आपण करत असलेला प्रयत्न सन्माननीय आहे. भारतातील महाराष्ट्र हि निव्वळ भौगोलिक सिमेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्र्रीय संस्कृती जगभर पसरलेला वेलू आहे. या मराठमोळ्या जागतिक उपयोजन प्रणाली मध्ये आपले स्वागत आहे.
मराठीभाषेच्यासमृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत त्यातीलच आपला हा सात्विक उपक्रम आहे. आजच्या जागतिक मराठी भाषेला आपण समजून घेऊन सांस्कृतिक संवर्धनाचे कार्य आपल्या सामाजिक सहकार्याशिवाय अशक्य आहे. मराठी भाषा संस्कृती उपयोजित प्रणालीतून अधिकाधिक अभिजनांच्या सहभागातून  विविध उपक्रमाचे प्रयोजन कार्यान्वित आहे. आपल्या सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा सार्थ आहे.

मराठी साहित्य संस्कृती प्रणाली

माझी आई : 
कर्मयोगी / ज्ञान योगी / हिरकणी / धर्म योगी / वात्सल्य सिंधू / व्रतस्थ / ध्यान योगी / राष्ट्र योगी 

स्पर्धकांनी यातील एक संकल्पना घेऊन त्यांची आई कशी त्या संकल्पनेत योग्य आहे तेच सर्व तपशील / छायाचित्र इत्यादी चा उपयोग करून त्यांनी 3000 ते 10000 शब्दात आईचे छोटे खाणी चरित्र लिहायचे आहे. यात आईने दिलेला महत्वाचा " संस्कार किंवा कानमंत्र स्पष्ट करून सांगायचं आहे. यात मराठी संस्कृतीची अस्मिता आईने कशी जोपासली त्याचे स्पष्ट उल्लेख असले पाहिजेत. प्रत्येक चरित्र संकेत सेन्सइंडिया च्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जाईल. पुरस्कार विजेत्यांना एका विशेष कार्यक्रमात् सन्मानित केल जाईल. त्यांच्या आई वर छोटा माहितीपट तयार केला जाईल. मातृत्व संकल्पना आधुनिक पद्धतीने सर्व लोकांना विशद व्हावा ही प्राथमिक अपेक्षा या स्पर्धेतून विश्लेषित झाली पाहिजे. चार वेगळे वयोगट करण्याचे कारण आई उत्तोरोत्तर आपल्या वयोमाना नुसार समजायला लागते....प्रत्येक वेळी जेव्हा ...आई ग ...म्हणतो तेव्हा त्याचा गर्भितार्थ वेगळा असतो ...मराठी साहित्य संस्कृती प्रणाली आणिअभय अभियान ट्रस्टच्या सहयोगाने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौ कविता संग्रारकर यांच्याशी ९८३३४०८९५३ यांच्याशी संपर्क साधावा .

मराठी साहित्य संस्कृती प्रणाली 
    आणि अभय अभियान ट्रस्ट आयोजित 
             जागतिक 
           मातृ चरित्र 
         लेखन स्पर्धा 

वरळी पोद्दार अभ्यास गल्ली 

मित्रानो आजच्या लेखातून व्यक्ती विशेष म्हणून कुणाचे कौतुक करायचे नाही. माझे तर बिलकुल नाही. फक्त माझ्या आयुष्यातील वरळी पोद्दार अभ्यास गल्ली स्थान विशेष सांगायचे आहे असे नाही ते आमच्या समस्त वरळीकर मित्रांचे मनोगत म्हणा हवे तर . वरळीतील कामगार वस्तीतील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस एक रस्ता आहे. त्या रस्त्याचे नाव आम्ही वरळीकरांनी विशेषता विद्यार्थ्यांनी पोद्दार गल्ली असे ठेवले आहे.  
बरे या अभ्यास गल्ली चा जन्म इ.स.कधी झाला मला खरेच माहित नाही.

वरळी मध्ये वस्ती ४ प्रकारची. अति श्रीमंत. ज्यांची घरे समुद्र किनार्याला. काही खेळाडू, नट नट्या सुद्धा इथे राहत. सुनील गावस्कर, जीनत अमान सुद्धा राहायची बरे आमच्या विभागात. 
दुसरी वस्ती सहकारी गृह.नि.संस्था. आदर्श नगर, शिवाजी नगर, तत्सम सोसायटीज.
तिसरी वस्ती बी.डी डी चाळ आणि इतर चाळी उदाहरणार्थ भिवंडीवाला, दुधवाला चाळ,थोक्रसी चाळ, इत्यादी, अन शेवटची वस्ती अति गरीब - झोपडपट्टी - सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर वगैरे. प्रसिद्ध अभिनेते श्री सुधीर दळवी वरळी बी.डी.डीतलेच.

आमच्या वरळीतील बी.डी डी चाळी एकूण १२१. एका चाळीत ८० कुटुंबे. एक रूम फक्त. म्हणून मुलांना अभ्यास करायचा असेल तर बहुतेक मुले तरी घराबाहेर पडायची. 
निसर्गरम्य वातावरण. भरपूर झाडे. छान वार्याची झुळूक यायची. पंख्याची गरज नाही. एक किलोमीटरचा हा शांत रस्ता. इथे वर्दळ फक्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची.
परीक्षेच्या काळात खूप गर्दी व्हायची. प्रत्येक ३ फुटावर एक मुलगा रस्त्यावर पेपर टाकून अभ्यास करीत बसायचा. फूट पाथच काय रस्त्याच्या कडेला सुद्धा. तिकडे एक चर्च होते. प्रवेश द्वाराजवळ, हॉस्पिटलच्या कट्ट्यावर, जिथे जागा मिळेल तिथे मुले बसायची. 

 मी ८वीत असताना एके दिवशी चाळीत काही कार्यक्रमानिमित्त LOUD SPEAKER लावला गेला होता. आई /बाबास घरी सांगितले मी अभ्यास करायला पोद्दार गल्लीत जातो. तिथे शांतता असते. घरून परवानगी दिली गेली. आमचा प्रवेश झाला. स्वतालाच कौतुक वाटत होते. SENIOR मुले रस्त्यात चालता चालता पुस्तक वाचत होते. काही जण बसून भिंतीला टेकून कुणी झोपून वाचत होते. कुणी एकत्र गणिताचा अभ्यास करीत होते. बरे हे सर्व दिव्याखाली बरे का. एक दिवस अभ्यास केला. नंतर ओढा लागला तो अगदी नोकरी मिळे पर्यंत. पदवी पर्यंतच नाही नोकरी मिळेपर्यंत गल्ली सुटली नव्हती.
घरातून निघालो कि खाली मैदानातील मुले जे अभ्यासू नव्हती ते आम्हाला चिडवीत असत उगाच उपहासाने. चालला गल्लीत. मग त्यावर एक उपाय निघाला. पुस्तक पोटात लपवून न्यायचो सुरुवातीला. नंतर कुणाच्या बापाला कशाला घाबरायचे अश्या अविर्भावात आम्ही जावू लागलो. हे बरेच ठिकाणी व्हायचे. 
वरळीत एक नगर सेवक होते, आदरणीय श्री संभा चव्हाण. त्यांनी खास EXTRA दिवा बत्तीची सोय केली होती. नंतर तर दगडी खुर्च्या सुद्धा बसविल्या. आमच्यातील SENIOR काही मंडळी आमच्यावर लक्ष ठेवून असायची. आवाज करून द्यायची नाही. तसेच त्या रोड वरून कुठलीही गाडी स्पीड मध्येच काय स्लो सुद्धा जावून द्यायची नाही बहुतेक वेळा. काही छोटी मुले दगड टाकायची त्या गाड्यांवर. जेणेकरून इकडून गाड्या आणू नका. (जणू आम्ही रस्ताच विकत घेतला होता हा हा हा ).

आज सुद्धा आठवते तिथे एक एक व्यक्ती अन वल्ली मला भेटल्या. 
काही विद्यारथी फक्त अभ्यासाला जातो सांगायची पण त्यांचे बिलकुल लक्ष नसायचे. काही अगदी घासू होती. म्हणजे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास अगदी सुरुवाती पासून. थोडा फार मी ही होतो. काही पाठांतर वाले तर काही तिकडे पेपर वगैरे फुटतो काय या आशेवर शेवटी येणारे. 
काही एवढे गरीब होते कि सकाळी हातगाडी ओढायचे अन रात्री अभ्यासाला यायचे. आज त्यातील एक जण पोलीस इन्स्पेक्टर आहे. एकमेकास शिकवून मित्र मंडळी पुढे जात होती. रात्री कधी कधी तिकडेच झोपायचो आम्ही बरेच लोक. चहा पिण्यासाठी CAFE CITY म्हणून वरळी नाक्यावर एक फेमस हॉटेल होते. एक कटिंग चहा प्यायचो. झोप गायब. (अभ्यासाची नाईट मारणे हा शब्द प्रयोग वापरायचे काही मित्र). अन हो कधी कधी शांततेसाठी आम्ही पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात जिथे तळ मजल्यावर जागा मिळेल तिकडे अभ्यास करायचो. काही मित्र घाबरवायची. अरे समोर डेड बॉडीज ठेवल्यायत. पण भीती वगैरे नव्हती वाटत. अंध श्रद्धा निर्मुलनचे - श्री श्याम मानव यांची काही व्याख्याने ऐकली होती. 

मित्रानो या गल्लीने आम्हाला शिकविले. आज ही ट्रेन मध्ये काही चेहरे ओळखीचे दिसले अन विचारले (काय माहित आहे का, गल्लीत असायचास ना किंवा गल्ली मेम्बर, इतरांना हास्यास्पद वाटेल.) कि आठवणी जाग्या होतात. गेले ते दिन गेले. 

वरळीत गेलो कि कधी तरी फेरी मारतो. या झाडाखाली, या कट्ट्यावर बसायचो. त्याचा एक फोटो घेतो. कट्टा तसाच आहे पण विद्यार्थी बदलत जातात. भावूक होतो अन वाटते पुन्हा एकदा ५० तरी मित्रांना एकत्र जमवावे. आज बरेच मित्र माझ्या संपर्कात आहेत. कोणी बँकेत, MANAGER, पोलीस ानिरीक्षक , भारत पेट्रोलीयम मध्ये, सहकारी बँकेत, कुणी शत्रू मालमत्ता विभागात, 
 LIC DEVELOPMENT OFFICER. हायकोर्ट ऑफिसर, हे जे भेटले त्यांची यादी. अजून कित्येक लोक भेटले नाहीत. फेसबुक वर मी शोधून काढतो. कधी तरी बोलतोही त्यांच्याशी. गल्लीच्या आठवणी share केल्या जातात. एक आग्रह जरूर होतो गजा जरा मनावर घे अन गेट टूगेदर कर. आम्ही नक्की येवू. 

मन धावू लागते भूतकाळातल्या त्या आठवणी पुन्हा वर येतात. आज आम्ही वरळीतील जे चांगल्या पदांवर आहेत त्या मागे या पोद्दार अभ्यास गल्लीचा मोठा हाथभार हे सांगायला लाज वाटत नाही. 
कळत नकळत त्या जागेला सलाम ठोकत होतो मनातल्या मनात, आज जाहीरपणे.
- आपला 
गजाभाऊ लोखंडे