नमस्कार मंडळी !!! मराठी संस्कृती ची अस्मिता संवेदनशिलतेने जपण्यासाठी आपण करत असलेला प्रयत्न सन्माननीय आहे. भारतातील महाराष्ट्र हि निव्वळ भौगोलिक सिमेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्र्रीय संस्कृती जगभर पसरलेला वेलू आहे. या मराठमोळ्या जागतिक उपयोजन प्रणाली मध्ये आपले स्वागत आहे.
मराठीभाषेच्यासमृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत त्यातीलच आपला हा सात्विक उपक्रम आहे. आजच्या जागतिक मराठी भाषेला आपण समजून घेऊन सांस्कृतिक संवर्धनाचे कार्य आपल्या सामाजिक सहकार्याशिवाय अशक्य आहे. मराठी भाषा संस्कृती उपयोजित प्रणालीतून अधिकाधिक अभिजनांच्या सहभागातून विविध उपक्रमाचे प्रयोजन कार्यान्वित आहे. आपल्या सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा सार्थ आहे.
मराठी साहित्य संस्कृती प्रणाली
माझी आई :
कर्मयोगी / ज्ञान योगी / हिरकणी / धर्म योगी / वात्सल्य सिंधू / व्रतस्थ / ध्यान योगी / राष्ट्र योगी
स्पर्धकांनी यातील एक संकल्पना घेऊन त्यांची आई कशी त्या संकल्पनेत योग्य आहे तेच सर्व तपशील / छायाचित्र इत्यादी चा उपयोग करून त्यांनी 3000 ते 10000 शब्दात आईचे छोटे खाणी चरित्र लिहायचे आहे. यात आईने दिलेला महत्वाचा " संस्कार किंवा कानमंत्र स्पष्ट करून सांगायचं आहे. यात मराठी संस्कृतीची अस्मिता आईने कशी जोपासली त्याचे स्पष्ट उल्लेख असले पाहिजेत. प्रत्येक चरित्र संकेत सेन्सइंडिया च्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जाईल. पुरस्कार विजेत्यांना एका विशेष कार्यक्रमात् सन्मानित केल जाईल. त्यांच्या आई वर छोटा माहितीपट तयार केला जाईल. मातृत्व संकल्पना आधुनिक पद्धतीने सर्व लोकांना विशद व्हावा ही प्राथमिक अपेक्षा या स्पर्धेतून विश्लेषित झाली पाहिजे. चार वेगळे वयोगट करण्याचे कारण आई उत्तोरोत्तर आपल्या वयोमाना नुसार समजायला लागते....प्रत्येक वेळी जेव्हा ...आई ग ...म्हणतो तेव्हा त्याचा गर्भितार्थ वेगळा असतो ...मराठी साहित्य संस्कृती प्रणाली आणिअभय अभियान ट्रस्टच्या सहयोगाने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौ कविता संग्रारकर यांच्याशी ९८३३४०८९५३ यांच्याशी संपर्क साधावा .
मराठी साहित्य संस्कृती प्रणाली
आणि अभय अभियान ट्रस्ट आयोजित
जागतिक
मातृ चरित्र
लेखन स्पर्धा
SURBHOOMI MASTER - Documentary on Indian Musical Instruments Directed by Mangala Tatkare